“सहानुभूती नको, न्याय हवा; तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”, नसरापूर प्रकरणात वडिलांची विनंती


पुणे : पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 65 वर्षीय नराधमाने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडित चिमुकलीला निर्घृणपणे संपवले.

यानंतर आरोपीने पीडितेला गोठ्यात शेणात लपवलं होते. या संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. नसरापूरच्या गावकऱ्यांकडून आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी किंवा आरोपीला गावकऱ्यांच्या हाती सोपवावं, अशी मागणी करण्यात आली आहे.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतानाच, पीडित मुलीच्या वडिलांनी एक व्हिडिओ प्रसारित करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राजकीय नेत्यांना एक कळकळीची विनंती केली आहे.

पीडित मुलीचे वडील अस्थी विसर्जनासाठी देहू येथे गेले असताना त्यांनी हा व्हिडिओ संदेश जारी केला. त्यांनी म्हटले की, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत एकाही राजकीय नेत्याने सांत्वन करण्यासाठी माझ्या घरी येऊ नये.

जेव्हा त्या गुन्हेगाराला फाशी होईल, तेव्हाच आम्ही राजकारण्यांना भेटू. ही आपली आणि आपल्या कुटुंबाची नम्र इच्छा असल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!