पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील ‘या’ भागात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती..


पुणे : पुणेकरांसाठी एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ऐन पावसाळ्यात पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागेल. पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य वाहिनीची गळती रोखण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व टाक्या व केंद्रांचा पाणीपुरवठा बंद ठेवल जाणार आहे.

त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी, १७ जुलै रोजी बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा असल्याची होणार आहे. त्यामुळे पाण्याचा आवश्यक साठा करून पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांतर्गतातील गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, पार्वती दर्शन, मुकुंदनगर, इ. भागात पाणीपुरवठा बंद राहील.

पर्वती एचएलआर टाकी परिसरात सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर फेज 1 आणि 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेनगर, पं.पू.नगर, प.पू.नगर, ए. माळा, सॅलिसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पार्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, सर्व्हे नंबर ४२ कोंढवा खुर्द, साईबाबा नगर, या भागात पाणी पुरवठा बंद राहील.

पर्वती एलएलआर टाकी परिसर क्षेत्रा अंतर्गातील शहरातील सर्व पेठे, दत्तवाडी क्षेत्र, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन क्षेत्र, शिवाजीनगर क्षेत्र, स्वारगेट क्षेत्रात पाणी पुरवठा बंद राहील.

तसेच वारजे जलकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील चांदणी चौक भागात, गांधी भवन टँक भागात, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी भागात पाणी बंद राहील .दरम्यान, रहिवाशांना विनंती आहे की त्यांनी या आवश्यक कामात पुरेसे पाणी साठवून ठेवावे आणि पुणे महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!