अजित पवारांचा घात की अपघात? एएआयबीच्या प्राथमिक अहवालावर रोहित पवार काय म्हणाले…

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत आहे. या अपघाताचा एएआयबीचा प्राथमिक अहवाल समोर येणार आहे.या अहवालातून अपघाताचे नेमके कारण काय आणि सत्य परिस्थिती समोर येणार आहे. त्यामुळे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा एएआयबीचा प्राथमिक अहवाल उद्या येईल असे याआधी स्पष्ट केले होते. यावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी असे म्हटले आहे की,अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत असून केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या एएआयबीचा प्राथमिक अहवाल येईल आणि या अहवालातून सत्य गोष्टी बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलं.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, येत्या सोमवारी आम्ही आमच्याकडे आलेली नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहोत, त्यामुळे भूतकाळातील इतर घटनांप्रमाणे थातुरमातूर अहवाल देण्याचा प्रयत्न एएआयबी नक्कीच करणार नाही, ही अपेक्षा!”

आता अजित पवारांच्या विमाना अपघाताच्या एएआयबीच्या प्राथमिक अहवालातून काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.