….आता पुण्यातून सुटणार वंदे भारत ट्रेन ! दिवाळीच्या मूहूर्तावर देशाला आणखी ९ वंदे भारत ट्रेन !!

पुणे : दिवाळीच्या मुहूर्तावर देशात ९ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहेत. त्यातील एक एक्स्प्रेस आता पुणे येथून सुटणार आहे. पुणे ते सिकंदराबाद ही वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याहून धावणार आहे.
देशात वंदे भारतने एक्स्प्रेस अल्पवधीत लोकप्रिय ठरली. वेगवान असलेल्या या गाडीला सेमी हायस्पीड ट्रेन म्हटले जात आहे. या रेल्वेने भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे. यामुळे अनेक राज्यांनी वंदे भारत आपल्या भागातून सुरु करण्याची मागणी केली आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आलेली वंदे भारत एक्स्प्रेस राज्यात प्रथम गांधीनगर ते मुंबई सुरु झाली. त्यानंतर मुंबई गोवा, मुंबई साईनगर, मुंबई सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. त्यातील मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यावरुन जाते. परंतु आतापर्यंत पुण्यावरुन सुटणारी एकही वंदे भारत एक्स्प्रेस नाही. आता पुणे ते सिकंदराबाद अशी थेट धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. देशभरात दिवाळीत नऊ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहेत. त्यात पुणे ते सिंकदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे.
भारतीय रेल्वेच्या एकूण ३४ वंदे भारत एक्स्प्रेस संपूर्ण देशात धावत आहेत. ही संख्या लवकरच २०० पर्यंत करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवली आहे. स्वत: नरेंद्र मोदी यांचे लक्ष या हायस्पीड ट्रेनकडे आहे. देशात सुरु होणारी पहिली वंदेभारत एक्स्प्रेस वाराणसी ते दिल्ली आहे. त्यानंतर दुसरी दिल्ली ते काटरा ही वंदे भारत सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातून सुरु झालेली मुंबई ते गांधीनगर ही देशातील तिसरी तर राज्यातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे.