विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरला, सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 78 लाखांना फसवणूक, भयंकर माहिती आली समोर..


छत्रपती संभाजीनगर : राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा एआय चेहरा वापरुन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे याचीच चर्चा सध्या सुरु आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेला छत्रपती संभाजीनगर येथील एक वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉलवरुन फसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’द्वारे खोटा चेहरा बनवून नांगरे पाटील बोलत असल्याचे भासवत छत्रपती संभाजीनगर येथील एका वृद्ध दाम्पत्याला गंडा घालण्यात आला. पीडित दाम्पत्यापैकी पती हा सेवानिवृत्त सरकारी अधिकारी आहे. संबंधित वृद्ध दाम्पत्याला पोलीस अधिकारी बोलत असल्याचं सांगत सायबर गुन्हेगारांनी फोन केला.

दहशतवाद्यांच्या खात्यातून तुमच्या बँक खात्यात संशयास्पद 20 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. सतत फोन करुन त्यांना डिजिटल अरेस्टची भीती घालण्यात आली. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला, असे सांगत नांगरे पाटलांचा एआय चेहरा वापरत सायबर गुन्हेगाराने दाम्पत्याशी चर्चा झाली.

यामध्ये सहा दिवसात सायबर गुन्हेगारांनी दाम्पत्याला 78 लाख 60 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेला छत्रपती संभाजीनगर येथील एक वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉलवरुन फसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

दरम्यान, डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार बेकायदेशीर असून सामान्य नागरिकांनी या प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे. याबाबत अजून कोणाची फसवणूक झाली का याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेनं मात्र आधुनिक गोष्टींचा अतिरेक होत असल्याचे आणि त्यातून अनेकांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!