Viral News : जेवणात फक्त मटन नल्ली मिळाली नाही म्हणून वऱ्हाडीमध्ये जोरदार राडा, लग्नही मोडले, नेमकं काय घडलं?

Viral News : लग्न म्हटलं की रुसवे-फुगवे, मानापमान होत असतातच. कधी घेण्यादेण्यावरून वाजते, तर कधी जेवणावरून वाद होतो. पण काही दिवसांपूर्वी तेलंगणमध्ये वराकडचे लोक आणि वधूकडची मंडळी यांच्यादरम्यान अशा गोष्टीवरून महायुद्ध झाले, ज्याबद्दल कोणी विचारच करू शकणार नाही.
त्या भांडणामागचे कारण ऐकाल तर तुम्हीही हैराण व्हाल. जेवणात फक्त मटन नल्ली मिळाली नाही म्हणून वरात घेऊन आलेले सगळे एवढे चिडले की वराकडील लोकांनी सरळ लग्नच मोडलं आणि वधूला न घेता वरात तशीच माघारी गेल्याची घटना घडली आहे. या घटनेची सगळीकडे सध्या चर्चा सुरु आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. लग्नात मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली होती. पहिल्यांदा सर्व काही सुरळीत चालले होते.
मात्र मटण नल्ली न मिळाल्याने लग्नात आलेल्या पाहुण्यांनी अचानक गोंधळ सुरू केला आणि हा वाद एवढा वाढला की, मुलाच्या कुटुंबाने थेट लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आणि वरात तशीच माघारी गेली. जेवणात मटन नल्ली देण्यात आली नाही. त्यामुळे वधू कडची मंडळी आणि वराकडचे नातेवाईक यांच्यात भांडण सुरू झाले. Viral News
हा वाद एवढा वाढला की, हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले पोलिसांनी वराला आणि त्याच्या कुटुंबीयांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी पाहुण्यांना मटण नल्ली न दिल्याने अपमान केला आहे असे सांगून वराकडील मंडळींनी लग्न मोडले.
पण मुलाच्या कुटुंबीयांनी आम्हाला याबाबत आधी काहीच माहिती दिली नव्हती, असा युक्तिवाद वधूच्या बाजूने करण्यात आला. या कारणास्तव त्यांनी मांसाहारी जेवणामध्ये मटण नल्लीचा समावेश केला नाही.
पण जेवणात मटण नल्ली मिळाली की नाही, या एवढ्याशा छोट्या मुद्यावरून कोणी लग्न कसं मोडू शकतं, या विचाराने पोलीस आणि स्थानिक लोक आश्चर्यचकित झाले. मात्र, बरीच समज देऊनही वराकडच्या लोकांनी काहीच ऐकलं नाही आणि ते वधूला न घेताच घरी परत गेले.