विजयाचा धुरळा! पुणे महापालिकेत पुन्हा ‘महिलाराज’ ; भाजपच्या तब्बल ‘इतक्या’ महिला उमेदवारांची बाजी


पुणे : राज्यातील सर्वच महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सर्वत्र बाजी मारल्याच समोर आल आहे. अशातच सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे महापालिकेत पुन्हा एकदा महिलाराज आलं आहे.भारतीय जनता पक्षाने यंदाच्या निवडणुकीत ९२ महिला उमेदवारांना स्थान दिले होते. त्यापैकी ६७ महिला निवडून आल्या असून सर्वसाधारण गटातूनही महिलांनी विजय मिळवला आहे.

महायुती सरकारकला विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली.
‘लाडक्या बहिणीं’मुळे ‘महायुती’चे सरकार राज्यात पुर्नस्थापित झाल्याने महायुतीकडून महिला मतदारांना विशेष प्राधान्य देण्यात आले.यंदाच्या निवडणुकीत ९२ महिला उमेदवारांना स्थान दिले होते. त्यापैकी ६७ महिला निवडून येत बाजी मारली.

पुणे महापालिकेत १६५ नगरसेवकांची संख्या असून त्यामध्ये महिलांसाठी ८३ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला सर्व जागांवर उमेदवारी देताना ८३ ठिकाणी महिलांना उमेदवारी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता या महापालिकेत महिलांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

छत्रपती शिवाजीनगर कॉलनी मॉडेल (प्रभाग १२), वानवडी-साळुंखे विहार (प्रभाग १८), शंकर महाराज मठ-बिबवेवाडी (प्रभाग २०), काशेवाडी-डायसप्लॉट (प्रभाग २२), रविवार पेठ-नाना पेठ (प्रभाग २३), कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम हॉस्पिटल (प्रभाग २४), शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई (प्रभाग २५), घोरपडे पेठ-गुरूवार पेठ-समता भूमी (प्रभाग २६), डेक्कन जिमखाना हॅप्पी कॉलनी (प्रभाग २९) या प्रभागांमध्ये पुरूषांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण अधिक होते.

दरम्यान या महापालिकेत विरोधी पक्षांनी दिलेल्या महिला उमेदवारांमधून २० महिलांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
पल्लवी जावळे, विणा घोष, अर्चना जगताप, संगीता दांगट, रंजना टिळेकर आणि निवेदिता एकबोटे यांनीं महिला आरक्षण नसलेल्या जागांवर लढत देत विजय साकारला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!