दारूच्या नशेत बल्कर चालकाने ट्रक गॅरेजमध्ये घुसविला ! पाच वाहनांचा केला चक्काचूर ! सोरतापवाडीत दैव बलत्तर म्हणून अनेक जण बचावले ….!!


उरुळीकांचन : दारुच्या नशेत तुर्क असलेल्या बल्कर चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्याने बल्कर थेट महामार्गालगतच्या मोटर गॅरेज मध्ये घुसून गॅरेजमध्ये उभ्या तीन चारचाकी वाहने तसेच तीन दुचाकी वाहनांचा बल्करने चुराडा केल्याचा प्रकार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील हद्दीत घडला आहे.

सुदैवाने या अपघातस्थळी गॅरेज चालक नसल्याने नशीब बलत्तर म्हणून या अपघातातून काही बचावले आहेत.या प्रकरणी अशोक नारायण सुंकडे (वय -२७,ढाळेवस्ती, ता.पाटोळा, जि. बीड) हे दारूच्या नशेत बल्कर चालविणाऱ्या चालकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी गॅरेज मालक विनीत कुमार अमरपाल सिंग (वय -२६,रा. सोरतापवाडी, बालाजी वजन काट्यासमोर ता. हवेली ) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून सोलापूर दिशेने जाणाऱ्या सिमेंट बल्करच्या चालकाचे दारूच्या नशेत वाहन चालवित असताना बेधुंद अवस्थेत असताना सोरतापवाडी हद्दीत बल्कर (क्र. एम.एच.१२ एम व्ही. ४०७३) हा गॅरेजमध्ये शिरला.

या गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या (इर्टीका क्र.एम.एच १२ युसी ४११९( वेरणा एम.एच.१४ एनडी ०००८) तर पिक अप (एम.एच.१२ डीटी ९७३८) , मोटरसायकल (एम एच १२ डीए ९९५४ )या वाहनांत शिरुन वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या प्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!