पुणे ते नागपूर दरम्यान सुरू होणार वंदे भारत ट्रेन, प्रवास करणारांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या मार्ग….

पुणे : नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत प्रस्ताव मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने यासाठी रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. यामुळे प्रवाशांचे याकडे लक्ष लागले आहे.
या प्रस्तावाचे सध्या मूल्यांकन सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रवासी आणि व्यावसायिकांसाठी एक नवा प्रवास पर्याय खुला होईल. राज्यातील या मोठ्या शहरात प्रवासी मोठ्या प्रमाणावर ये जा करत असतात. यामुळे याबाबतची मागणी केली जात होती. नागपूर ते मुंबई प्रवासासाठी सध्या मेल ट्रेनने १६ तास, सुपरफास्ट ट्रेनने १२ ते १३ तास आणि दुरांतो एक्सप्रेसने ११ ते १२ तास लागतात.
वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यास वेळ वाचणार असून हा प्रवास फक्त १० तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार आहे. तसेच नागपूर ते पुणे प्रवास सध्या आठवड्यातून तीनदा चालणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस आणि हटिया-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेसद्वारे सुमारे ९ ते १० तासांपर्यंत पूर्ण होत आहे.
असे असले तरी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यास हे अंतर अवघ्या ३ तासांत कापता येणार आहे, ज्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे आता या प्रस्तावाकडे रेल्वे प्रशासन गांभीर्याने विचार करत असून लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना एक जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास पर्याय मिळणार आहे.
सध्याच्या गाड्यांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी असते, परंतु नव्या ट्रेनमुळे हा तणाव कमी होईल. सध्या, नागपूर-मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. विदर्भ एक्सप्रेस आणि सेवाग्राम एक्सप्रेस या दोन प्रमुख गाड्यांवरच मोठा भार दिसत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.