Vande Bharat Express : महाराष्ट्राला मिळाली ६ नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट, जाणून घ्या कसे असणार मार्ग…


Vande Bharat Express : राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर अली आहे. महाराष्ट्राला आणखी सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहेत. सध्या राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

तसेच आता भविष्यात महाराष्ट्राला आणखी सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. त्यामुळे राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या ११ वरून १७ वर जाणार आहे. दरम्यान, आता आपण महाराष्ट्रातील कोणत्या सहा मार्गांवर ही गाडी सुरू होणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Vande Bharat Express

राज्यातील कोणत्या मार्गांवर सुटणार गाडी…

मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, मुंबई ते कोल्हापूर या मार्गांवर आगामी काळात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

तथापि या संदर्भात अजून अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु देशातील प्रमुख शहरादरम्यान ही गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे आग्रही असल्याचे दिसते. यामुळे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कोल्हापूरला वंदे भारतची भेट मिळणार असे म्हटले होते. यानुसार पुणे ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे. परंतु प्रत्यक्षात ही गाडी मुंबई ते कोल्हापूर अशी चालवली जाणार होती.

त्यामुळे भविष्यात पुणे ते कोल्हापूर यादरम्यान सुरू असणारी ट्रेन मुंबई ते कोल्हापूर अशी चालवली जाईल अशी शक्यता बळावत आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे आणखी विस्तारणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!