धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार? वाल्मिक कराड संदर्भातील ‘ती’ शिफारस भोवणार, नेमकं प्रकरण काय?

बीड : बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांची मंत्रिपदावरुन हाकलपट्टी करण्यात यावी या मागणीने जोर धरला आहे. यामुळे आता ते राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दोन महिने उलटले आहेत. तरी देखील या निकालाविरोधात आव्हान देऊन याचिका दाखल करण्यात आली आहे. आमदारांच्या विरोधात मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
धनंजय मुंडे, सुरेश धस, संजय शिरसाठ, तानाजी सावंत, संजय बनसोडे, हिकमत उढाण, संतोष दानवे, अर्जुन खोतकर, आमदार रमेश कराड, राजू नवघरे, बाबासाहेब पाटील, अमोल पाटील, मंजुळा गावित, नमिता मुंदडा या आमदारांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
तसेच दुसरीकडे धनंजय मुंडे व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी माझी साडेतीन कोटी रुपये किमतीची जमीन हडप केल्याचा खळबळजनक आरोप दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे. त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समितीच्या अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम असल्याचं दिसून येत आहे.
बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून झाली होती अशी माहिती आहे.तसेव्ह दुसरीकडे वाल्मीक कराड याच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज नवा आरोप केला. ज्या बँका आणि पतपेढय़ा बुडाल्या त्यातही वाल्मीक कराडचा हात आहे. एका को-ऑपरेटिव्ह बँकेतील अधिकाऱयांना दमदाटी करून कराडने २ कोटींची डिफेंडर घेतली, असे धस म्हणाले आहेत.