ब्रेकिंग! वाल्मिक कराडचे पाय खोलात, आता थेट हत्या केल्याचा गुन्हा दाखल होणार? जाणून घ्या…

बीड : जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरुन राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे.

वाल्मिक कराड याला सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आता त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकतो. वाल्मिक कराडला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याआधीच मोठी बातमी समोर आली आहे.
मस्साजोगचे सरपंच दिवगंत संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुरवणी जबाबात वाल्मिक कराड याचे नाव समोर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी यांच्या जबाबात वाल्मिक कराड यांनी फोनवरून धमकी दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

संतोष देशमुख यांना एक महिन्यापासून धमकी मिळत असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे देशमुख कुटुंबियांनी वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर वाल्मिक कराडविरोधात हत्या केल्याचा गुन्हा दाखल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
