मुंबईकरांचे पोट भरणारा वडापाव महागला, काय आहे कारण?


मुंबई : गरिबांची पोटपूजा, मध्यमवर्गीयांचे फावल्या वेळेतील उदरभरण आणि श्रीमंतांसाठी चवीचे खाणे असलेला वडापाव महागणार आहे. मुंबईकरांसह सर्वांचे पोट भरणारा लाडका वडापाव महागण्याची चिन्हे आहेत.

कारण वडापावसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या पावाचे दर वाढविण्याचा निर्णय बेकरी असोसिएशनने घेतलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे कमी पैशात पोट भरण्याची हमी देणारा वडापावर महागण्याची चिन्हे आहेत. बेसन, कांदे, लसूण, तेल यांचे वाढलेले दर देखील वडापावच्या वाढणाऱ्या किंमतींना कारणीभूत मानले जात आहेत.

तसेच मुंबईकरांसह सर्वांचे पोट भरणारा लाडका वडापाव महागण्याची चिन्हे आहेत. याला पावाची दरवाढ कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईकरांची अडीअडचणीला पोट भरण्याची हमखास हमी देणारा वडापाव महागल्याने सर्वसामान्यांचे वांदे होणार आहेत.

रस्त्यावर वडापावाच्या गाड्यांवर सहज मिळणारा मुंबईकरांचा आवडता वडापाव महागल्याने सर्वसामान्यांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. बेकरी असोसिएशनने पावाची दरवाढ केली आहे. त्याचा फटका वडापावाला देखील बसणार आहे. एका पावाच्या किंमतीत ३७ पैशांची दरवाढ झालेली आहे.

दरम्यान, त्यामुळे आता आठ पावांच्या एका लादीत तीन रुपयांची दरवाढ झाली आहे. यापूर्वी बेसन, कांदे, बटाटे, लसूण, तेल महागल्यानंतर आता पावाची दरवाढ ही वडापावचे दर वाढवण्यासाठी निमित्त ठरली आहे. बदलापूर बेकरी असोसिएशनने पाव तयार करण्यासाठी लागणारे साहित्य महागल्याने आठ पावांच्या लादीत तीन रुपयांची दरवाढ केली आहे.

त्यामुळे यापूर्वी २० रुपयांना मिळणारी लादी आता २३ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे एका पावाच्या किंमतीत ३७ पैशांची दरवाढ झाली आहे. पण तरीही वडापावचे दर १ ते २ रुपयांनी वाढविले असल्याने नागरिक बुचकळ्यात सापडले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!