घरासमोर भीक मागायचा, पत्नी भिकाऱ्याच्या प्रेमात पडली, पती आणि ६ मुलांना सोडून पळाली, घडलं वेगळंच…


उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हरदोई येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले. या एका महिलाने भिकाऱ्यासोबत पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. 45 वर्षीय राजूने याप्रकरणी आपल्या पत्नी राजेश्वरी आणि भिकारी नन्हे पंडितविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलीस तपास करत आहेत. राजू आपल्या पत्नी आणि सहा मुलांसोबत हरदोईत राहत होता. त्याच भागात नन्हे पंडित नावाचा भिकारी नियमित भीक मागण्यासाठी येत होता. राजूच्या पत्नीशी त्याचे संभाषण वाढले आणि नंतर फोनवरही संपर्क सुरू झाला, त्यांचे नियमित भेटणे देखील सुरू झाले.

दोन दिवसांपूर्वी राजेश्वरी दुपारी घरातून बाजारात जात असल्याचे सांगून निघाली, पण ती रात्री उशिरापर्यंत परतली नाही. शोध घेतल्यावरही ती सापडली नाही. यामुळे सगळेच हादरले. यावेळी राजूला संशय आला की ती भिकाऱ्यासोबत पळून गेली असावी.

काही दिवसांपूर्वी घरातील म्हैस विकून आलेले पैसेही ती घेऊन गेली होती. यानंतर राजूने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवला. नंतर पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. सध्या पोलिस नन्हे पंडितचा शोध घेत आहेत. या घटनेने कुटूंबातील सदस्य चिंतेत आहेत.

सध्या राजेश्वरीची सहा मुलं आईच्या परतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत आता या प्रकरणाची वेगळीच चर्चा याठिकाणी सुरू झाली आहे. याबाबत पोलिसांनी दोघांचा तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!