खाकीतील माणुसकीच्या निरोपाला उरुळीकांचनकर गहिवरले! कर्तव्यनिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या निरोपाला मिळाली भावनिक किनार…


जयदिप जाधव                                                                               उरुळी कांचन : पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशात एक ‘समाजसेवक’ अशा दृष्टीकोणातून गेली दोन वर्षे उरुळीकांचन पोलिस ठाण्याची कर्तव्यपूर्तेतून समाजाशी भावनिक नाळ जोडणाऱ्या कर्तव्यनिष्ठ खाकितील माणुसकीच्या आदराला उरुळीकांचनकर मुकल्याची भावना व्यक्त करीत एका सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला निरोप दिल्याचा सोहळा उरुळीकांचन पोलिस ठाण्यात अनुभवायला मिळाला आहे.

उरुळीकांचन पोलिस ठाण्याचे स्वतंत्र ग्रामीण अधिक्षक कार्यालयात पोलिस ठाणे अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच प्रभारी अधिकारी पदाची जबाबदारी स्विकारणाऱ्या पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या बदलीच्या आदेशाने त्यांना निरोप देण्यासाठी पोलिस ठाण्यात सामान्य नागरीकांच्या अपुलकीचे आर्शिवाद कमवित त्यांनी पोलिस अधिकारीपदाची सूत्रे अर्पण केल्याचा एक भावनिक सोहळा पोलिस ठाण्याने अनुभवायला आहे.

उरुळीकांचन पोलिस ठाण्याला स्वतंत्र पोलिस ठाण्याचा अधिकार प्राप्त झाल्यातून पदाचे सूत्रे सांभाळणाऱ्या पोलिस निरीक्षक शंकर पाटिल यांनी पोलिस ठाण्यात कायदा व सुव्यवस्थाच नव्हे तर एक माणुसकी व कर्तव्याचे धडेही लोकांत रुजवित आपल्या दोन वर्षाचा कार्यकाळ सेवक म्हणून निभावला आहे.स्वतंत्र पोलिस ठाणे अस्तित्वात आल्यानंतर पोलिस ठाण्याचा इमारतीपासून, बैठक कक्ष, लॉकअप तसेच अंतर्गत व्यवस्थापन पासून अगदी परिसर कार्याला सुरुवात होण्याऱ्या पोलिस निरीक्षक पदाच्या जबाबदारीत सुसज्ज पोलिस ठाणे निर्माण करण्यात तसेच पोलिस ठाण्याला नैसर्गिक अधिवास देऊन पोलिस ठाण्यासाठी अगदी आयएसआय मानंकन मिळण्यासाठी वाटचालीत त्यांच्या दूरदृष्टीकोणात पहायला मिळाली.

       

नवीन पोलिस ठाणे म्हटले की जिल्ह्यात पोलिस दलातील टाकाऊ माल अर्थात भ्रष्टाचाराचे आरोप व कलंकित अधिकारी पोलिस ठाण्यावर लादण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कृतीला विरोध करणारे अधिकारी त्यांच्यात नागरीकांनी पाहिले. पोलिस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कृतीवर बोठ ठेऊन त्यांना सवयी बदलण्यास भाग पाडणारे अधिकारी म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.

दरसकाळी पोलिसांची ओळख परेड करुन कर्मचाऱ्यांना कर्तव्याचा सूचना देण्यातही त्यांच्या कार्यातील झरे सामान्यांना अनुभवायला मिळाले. सामान्य नागरिकांना थेट प्रवेश हा त्यांचा पोलिस अधिकारातील माणुसकीच्या बरूदलीत आदर्शाचा भाग ठेऊन त्यांनी सामान्यांना न्याय मिळून देण्याचा प्रयत्न केला. गुन्हेगारांवर जालिम उपाय तर नाठांळांना शासन देण्यात त्यांनी गुन्हेगारांवर विशेष कर्मचाऱ्यांचे नियंत्रण ठेवले होते.

उरुळीकांचन शहरातील सार्वजनिक वाहतुक कोंडी नेटाने सोडविण्याची त्यांची उपाययोजना आजवाहतुक कोंडीमुक्त झाल्याचा परिचय देत आहे.पोलिस ठाण्यातील अधिकारी,कर्मचारी यांचा सामान्यांशी समन्वय वाढावा म्हणून एक व्यासपीठ तसेच सामाजिक सलोख्यांसाठी बैठकांचे आयोजन या त्यांच्या कर्तव्य निष्ठ अधिकाराचा भाग होता. अवैध धंद्यावर सर्वाधिक कारवाई त्यांच्या कार्यकाळात पहायला मिळून राजकीय हस्तक्षेपांना टाळून ते नेहमीच कर्तव्याच्या भावनेतून कार्यरत राहिल्याचा प्रत्यक्ष त्यांच्या कार्यपद्धतीत दिसून आला.

त्यांच्या खाकीतील माणुसकीला बदली झाल्यानंतर निरोपात मिळालेले भावनिक स्थान क्वचितच कुठल्या पोलिस अधिकाऱ्याला नशिबात मिळेल अशी भावनिक किनार या निरोप सभारंभात पहायला मिळाली. दरम्यान हवेली पोलिस ठाण्यातून पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी उरुळीकांचन पोलिस ठाण्याची सूत्रे स्विकारली आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!