Uruli Kanchan : इंग्रजीच्या विषयाने बारावीच्या परिक्षेस सुरुवात! उरुळीकांचन येथील डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत..!!

Uruli Kanchan उरुळी कांचन : राज्यात आजपासून १२ वी ची परीक्षा सुरू झाली आहे. यावेळी अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. उरुळी कांचन (ता.हवेली) येथील अजिंक्य चारीटेबल फाऊंडेशनच्या डॉ. आस्मिता ज्युनिअर कॉलेज मध्ये १२ वीची परीक्षेला विद्यार्थ्यांचे उत्सहात स्वागत करण्यात आले आहे.
यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व विद्यार्थ्यंना शुभेच्छा देण्यात आले.
विद्यार्थ्यांना कुठलाही ताण न होता मोकळ्या वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पेपर देण्यात यावा, अशा शुभेच्छा डॉ अजिंक्य दादा कांचन यांनी दिल्या आहेत.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन, सचिव, डॉ. अजिंक्य कांचन , कार्यकारी संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे, केंद्रप्रमुख परभाणे सर, उपकेंद्रप्रमुख फलकेसर, जाधव सर, प्राचार्य जगताप , उपप्राचार्य चव्हाण उपस्थित होते. Uruli Kanchan
अजिंक्य चारीटेबल फाउंडेशन डॉ. आस्मिता ज्युनिअर कॉलेज एच. एस.सी परिक्षा केंद्र क्रमांक ००८४ वरती आज इंग्रजी विषयाचा पेपर साठी एकून ३७४ विद्यार्थी परीक्षेत उपस्थित होते.
या केंद्रावरती, उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता ज्युनिअर सह, जोगेश्वरी माता माध्यमिक, उच्चमाध्यमिक विद्यालय वाडेबोल्हाई (ता.हवेली) तसेच पंचकोशी शेतकरी तांत्रिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वाघापूर (ता.पुरंदर), अशा एकूण ३७४ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते.