पुण्यात पोलिस दलात खळबळ ; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून वाहतूक पोलिसाची आत्महत्या, मन हेलावणारी सुसाईड नोट समोर…


पुणे: गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आत्महत्या घटना समोर येत आहेत. अशातच आता पुण्यातील तळेगाव दाभाडेमध्ये वाहतूक पोलिसाने वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, माधव केरबा डोके (३६ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या वाहतूक पोलिसाचे नाव होते. माधव डोके हे तळेगाव दाभाडे वाहतूक विभागात काम करत होते. वरिष्ठांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी माधव डोके यांनी सुसाईड नोट लिहिली होती यामध्ये त्यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले आहे. यामध्ये त्यांनी वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

वाहतूक पोलिसांनी लिहिलेली सुसाईड नोट?

वरिष्ठ अधिकारी मला कर्तव्यावर असताना वारंवार पावती न फाडता गाड्या सोडत जा आणि संध्याकाळी मला येऊन भेटत जा असे सांगायचे. त्यांना मी नकार दिल्यावर त्यांनी माझा मानसिक छळ करून मला शिवीगाळ देखील केली. तळेगाव दाभाडे स्टेशन चौकात नो एन्ट्रीमध्ये 200 रुपये घेऊन त्यांच्या पोलिस गाडीच्या चालकाने गाड्या सोडल्या होत्या.

एपीआय लोंढे यांच्यापुढे त्या पोलिसांना हजर केले असता ते म्हणाले ठीक आहे असे म्हणत पैसे घेऊन त्यांनी गाड्या सोडल्या.
तसंच, ‘एपीआय लोंढे यांनी मलाच शिवीगाळ केली. हा मनस्ताप मला सहन झाला नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.’, असे देखील वाहतूक पोलिस माधव डोके यांनी म्हटले आहे

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी या पोलिसाने सुसाईड नोट लिहल्याने या आत्महत्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. आता या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!