अवकाळीचा कहर अजूनच वाढणार, 10 मे पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात पडणार पाऊस, शेतकरी चिंतेत..!


पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता 10 मे पर्यंत हा अवकाळी पाऊस राहणार आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये १० मे पर्यंत पाऊस राहणार आहे.

यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या मते ९ व १० मे या दरम्यान सातारा, सांगली, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, पंढरपूर, कोकण किनारपट्टी, माळशिरस, लातूर, रत्नागिरी, रायगड या भागामध्ये पाऊस पडेल.

तसेच १६ मे च्या दरम्यान विदर्भामध्ये पूर्ण हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे कांदा काढण्याचा अंतिम टप्पा शेतकऱ्यांना पूर्ण करता येईल. 17 मे नंतर पुन्हा संपूर्ण राज्यात अवकाळी चा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, याचा परिणाम मोसमी पावसावर होऊ नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जर मोसमी पाऊस कमी झाला तर काय करायचे? याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!