चेंबूरमध्ये बिल्डर्सवर अज्ञातांकडून गोळीबार, घटनेने उडाली खळबळ….


चेंबूरमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मैत्री पार्क येथे बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सायन-पनवेल महामार्गावरून सदरुद्दीन खान नवी मुंबईला जात असताना डायमंड सिंगल येथे त्यांच्यावर गोळीबार झाला आहे.

घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत सदरुद्दीन खान यांच्यावर ४-५ गोळ्या अज्ञात इसमाकडून झाडण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत. गोळीबार करणारे दोन हल्लेखोर बाईकवरून आले होते. जवळून गोळीबार करून ते पसार झाले.

सध्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. गोळीबारानंतर एका लेनची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्यामुळे येथे प्रचंड ट्रॅफीक असते. या घटनेने येथे घबराट पसरून आणखीन गोंधळ उडाला. संपूर्ण सायन ते पनवेल महामार्गावरील ट्रॅफीक त्यामुळे जाम झाली आहे.

फोरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. सायन-पनवेल महामार्गावरून सदरुद्दीन खान नवी मुंबईला जात असताना डायमंड सिंगल येथे त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत काहींना ताब्यात घेतले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!