उद्धव ठाकरेंना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा! पक्षाचे नाव, चिन्ह वापरता येणार…!


मुंबई : केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला प्रतीक्षा लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी येत्या काही दिवसात होईल. निवडणूक आयोगाकडून प्रचंड निराशा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना एकमेव आशा सुप्रीम कोर्टाकडून आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली . त्यानुसार त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह आता तूर्तास वापरण्याची परवानगी मिळाल्याचे समजते आहे.

 

 

 

 

 

 

 

तत्पूर्वी , उद्धव ठाकरे गटाला कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीपुरतेच पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास परवानगी मिळाली होती. त्याची मुदत आज २७ मार्च रोजी संपणार होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत हे पक्षनाव आणि चिन्ह वापरता येणार असल्याचे समजते आहे.

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना म्हणत धनुष्यबाणावर दावा केला. तेव्हा निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह दिले. कसबा आणिचिंचवड पोटनिवडणुकीसाठीही हेच चिन्ह वापरण्याची मुभा मिळाली होती.

 

 

 

 

 

 

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता सत्तासंघर्षाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत पक्षचिन्ह आणि नाव ठाकरे गटाला वापरता येणार असल्याचे समजते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!