तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! शाहरुख खानसह 3 बड्या सुपरस्टार्सना FDAची नोटीस; नेमकं प्रकरण काय?


मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या राज्यभरातील कारवायांमुळे चर्चेत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांनंतर आता बॉलिवूडमधील बड्या कलाकारांच्या जाहिरातीही FDAच्या रडारवर आल्या आहेत. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या तीन लोकप्रिय अभिनेत्यांना FDAने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या तिन्ही अभिनेत्यांनी केलेल्या ‘इलायची’च्या जाहिरातीवरून ही नोटीस देण्यात आली आहे. संबंधित जाहिरात ही केवळ इलायचीची जाहिरात न राहता अप्रत्यक्षपणे पान मसाल्याचा प्रचार करत असल्याचा FDAचा आक्षेप आहे.

महाराष्ट्रात पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी आहे. 13 जुलै 2026 रोजी अन्न सुरक्षा आयुक्तांनी यासंदर्भात आदेश जारी केला होता. त्यामुळे प्रतिबंधित उत्पादनांच्या अप्रत्यक्ष जाहिरातींवरही FDAकडून लक्ष ठेवले जात आहे.

जाहिरातीतील ब्रँडचे नाव, संवाद, सादरीकरण आणि बाजारातील संदर्भ लक्षात घेता ती पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात असल्याचा संशय FDAने व्यक्त केला आहे. त्यामुळे शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्याकडून याप्रकरणी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

आता तिन्ही कलाकारांकडून काय उत्तर दिलं जातं आणि त्यांच्या स्पष्टीकरणानंतर FDA पुढील कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!