मोठी बातमी! पुणे – सोलापूर महामार्गावर मालट्रक पेटला, ट्रक पूर्णतः जळून खाक..


पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरइंदापूर तालुक्यातील पळसदेव हद्दीत रात्री दोन वाजता टिशू पेपर मालवाहतूक ट्रकला भीषण आग लागली.

आगीत मालवाहतूक ट्रक जळून खाक झाला आहे. ट्रकचे लायनर गरम झाल्यामुळे आग लागल्याची माहिती आहे. या घटनेमध्ये मालट्रकचे मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक -गणेश गोविंद बोडके (रा रिकोळगी ता हुमनाबाद जिल्हा बिदर) हे ट्रक घेऊन सोलापूरहून पुण्याकडे जात होते. ब्रीजच्या जवळ ट्रक चे लायनर गरम झाल्याने ट्रकला आग लागली. त्यामध्ये जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही.

ट्रकचे व मालाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पहाटे पाच ते साडे पाच पर्यंत दोन अग्निशामक बंब बिल्ड कंपनी भिगवण व इंदापूर नगरपरिषद यांच्या साह्याने आग विझवण्यात आली.

सदरच्या घटनेच्या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनचा स्टाफ तात्काळ हजर झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली. आगीच्या घटनेमुळे पहाटे -महामार्गावर काही काळ लागल्या होत्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!