पुणे शहर पोलीस दलातील 23 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, हडपसर, सहकारनगर, कोरेगाव पार्क, खडकी, लोणी काळभोर येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

पुणे : पुणे पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले असून शहर पोलीस दलातील २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे बदल केले जात आहेत.
यामध्ये प्रामुख्याने वाहतूक, गुन्हे, विशेष शाखा येथील पोलीस निरीक्षकांच्या शहरातील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या प्रामुख्याने विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक शाखेत बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे. यामध्ये आता सुनिल थोपटे (वाहतूक शाखा) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पो. स्टे. दिलीप फुलपगारे (नियंत्रण कक्ष) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पो. स्टे.
सीमा ढाकणे (विशेष शाखा) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पो. स्टे. मनिषा पाटील (विशेष शाखा) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पो. स्टे. राजेंद्र पन्हाळे (पोलीस निरीक्षक, गुन्हे, विमानतळ) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पो. स्टे.
सत्यजित आदमाने (विशेष शाखा) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे. नरेंद्र मोरे (कोर्ट कंपनी) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक, सुरेश शिंदे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर) ते वाहतूक शाखा, रुणाल मुल्ला (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क) ते वाहतूक शाखा.
संगीता जाधव (गुन्हे शाखा) ते वाहतूक शाखा राजेंद्र करणकोट (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर) ते वाहतूक शाखा
स्वप्नाली शिंदे (सायबर) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर
दशरथ पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ) ते विशेष शाखा
सतीश जगदाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी) ते विशेष शाखा, गुरदत्त मोरे (वाहतूक शाखा) ते विशेष शाखा, माया देवरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड) ते गुन्हे शाखा, संतोष पांढरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर) ते गुन्हे शाखा, संजय पतंगे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी) ते गुन्हे शाखा
छगन कापसे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,सहकारनगर) ते गुन्हे शाखा, संतोष पाटील (विशेष शाखा) ते मनपा अतिक्रमण विभाग. सावळाराम साळगावकर (वाहतूक शाखा) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पो. स्टे., राहुल गौड (पोलीस निरीक्षक, खडक) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पो. स्टे., संजय मोगले (नव्याने हजर) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पो. स्टे.