Tirupati Balaji : तिरुपती बालाजी मंदिरात लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी? धक्कादायक आरोपाने उडाली देशात खळबळ…

Tirupati Balaji : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी खळबळजनक आरोप केला. त्यांनी मागील वायएसआर काँग्रेसवरच्या राजवटीत तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचं म्हटलं आहे.

लाडू तयार करतांना शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली, असा आरोप चंद्राबाबू यांनी केला आहे. वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने हा आरोप दुर्भावनापूर्ण असल्याचं म्हणत नाकारला आहे.
यामुळे आंध्र प्रदेशमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण तिरुमला तिरुपती देवस्थानाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. चंद्राबाबू यांच्या आरोपानंतर आंध्र प्रदेशमधील राजकारण तापले आहे. Tirupati Balaji

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व चंद्राबाबू नायडू यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या वतीनं भक्तांना देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप खुद्द मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्याने मोठा गदारोळ माजला आहे. नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.

बुधवारी एनडीए विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत संबोधित करताना चंद्राबाबू नायडू म्हणाले की, जगन रेड्डी सरकारच्या काळात तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू बनवण्यासाठी शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती.
दरम्यान, मंदिराचे व्यवस्थापन ‘तिरुमला’ तिरुपती देवस्थानम द्वारे केले जाते. नायडूंचा तेलुगू देसम पक्ष जूनमध्ये पवन कल्याण यांच्या जनसेना आणि भाजपसोबत युती करून आंध्र प्रदेशमध्ये सत्तेवर आले आहेत.