महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत हजारो मृत्यू झालेत, काहींना गंगेत सोडलंय तर काहींना जमिनीत गाडलं, धक्कादायक माहिती आली समोर….


प्रयागराज : मौनी अमावस्या आणि शाही स्नानाच्या दिवशी महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दी झाली होती. गंगा किनारी प्रयागराजमधील घाटांवर आज काही कोटी भाविक शाही स्नान करतील असा अंदाज आहे. यावेळी पहाटे महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. यात १७ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले गेले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना स्नानासाठी संगम नोजवर जाऊ नका असे आवाहन केलं होते.

असे असताना या महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, आता या प्रकरणी समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. रामगोपाल यादव म्हणाले की, हजारो लोकांचा इथं मृत्यू झालाय. काही लोकांचे मृतदेह गंगेत सोडून देण्यात आले. तर काही लोकांचे मृतदेह गाडण्यात आले आहेत. संख्या ३० पेक्षा जास्त होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह दिले गेले नाही. पोस्टमार्टम केलं जात नाही. १५ ते २० हजार रुपये देऊन पैसे घ्या आणि घरी जा असं सांगितलं जात आहे. हे कुठेही समोर येऊ नये, आकडा वाढू नये यासाठी प्रयत्न होत आहे. असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.

या घटनेमुळे अखिल भारतीय अखाडा परिषदेतून मौनी अमावस्येचे अमृत स्नान सध्या रद्द केले असल्याचे सांगितले होते. या घटनेनंतर प्रशासनाने मदत कार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखरेखीखाली पूल उभारले गेले ते बंद करण्यात आले. फक्त आखाडा आणि व्हीव्हीआयपींना रिकामे ठेवले गेले. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप खासदार यादव यांनी केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!