महिलांसाठी असलेली ‘ही’ योजना होणार बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

मुंबई : महिला सशक्तीकरण आणि सुरक्षित बचतीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली महिला सम्मान सेविंग्स सर्टिफिकेट योजना ३१ मार्च २०२५ नंतर बंद होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांच्या मुदतीसह ही योजना महिलांसाठी मोठी संधी ठरली आहे.
मात्र, सरकारकडून या योजनेत मुदतवाढ देण्यात येईल की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे इच्छुक महिलांनी ३१ मार्चपूर्वी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.
ही एक विशेष मुदत ठेव योजना आहे, जिथे महिला आणि मुलींना बचतीची संधी दिली जाते. या योजनेत वार्षिक ७.५% व्याजदर मिळतो आणि ठेवीवर प्रत्येक तिमाहीला व्याज जमा होते. मुदतपूर्तीच्या वेळी गुंतवलेली रक्कम आणि व्याज एकत्र परत मिळते. कमी जोखमीच्या आणि स्थिर परताव्याच्या पर्यायांपैकी ही एक आहे, त्यामुळे अनेक महिलांनी यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे.
ही एक २ वर्षांची विशेष मुदत ठेव योजना आहे, जिथे महिलांना किंवा मुलींना गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते. या योजनेत ठेवीवर प्रत्येक तीन महिन्यांनी व्याज जमा होते, आणि मुदतपूर्तीच्या वेळी संपूर्ण रक्कम व्याजासह परत मिळते. महिलांसाठी स्थिर आणि सुरक्षित पर्याय म्हणून ही योजना उपयुक्त आहे.
दरम्यान,या योजनेत प्रत्येक महिला आणि मुली सहभागी होऊ शकतात. अल्पवयीन मुलीसाठी तिचे पालक किंवा कायदेशीर संरक्षक खाते उघडू शकतात. अर्ज करण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरावा लागतो. अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा (विज बिल, पासपोर्ट, इत्यादी) आणि एक पासपोर्ट साइज फोटो जमा करावा लागतो.