कार खरेदीचा विचार करताय? 1 जुलैपासून महागणार ‘ही’ लग्जरी वाहनं, जाणून घ्या कारण..


मुंबई : लग्जरी कार खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. BMW ग्रुप इंडियाने 1 जुलै 2026 पासून BMW आणि MINI या दोन्ही ब्रँडच्या कारच्या किंमतींमध्ये 2 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ कंपनीच्या संपूर्ण मॉडेल पोर्टफोलिओवर लागू होणार आहे.

BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हरदीप सिंह बराड यांनी सांगितले की, भारतीय बाजारपेठेत BMW वाहनांना सातत्याने चांगली मागणी मिळत आहे. मात्र रुपयाचे अवमूल्यन आणि वाढलेला लॉजिस्टिक खर्च यामुळे किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांना प्रीमियम दर्जाची उत्पादने आणि उत्कृष्ट सेवा देण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतामध्ये BMW अनेक लोकप्रिय मॉडेल्सचे स्थानिक उत्पादन करते. यामध्ये BMW 2 Series Gran Coupe, BMW 3 Series Long Wheelbase, BMW 5 Series Long Wheelbase, BMW 7 Series, BMW X1, BMW X3, BMW X5, BMW X7, BMW M340i आणि BMW iX1 Long Wheelbase यांचा समावेश आहे. तसेच BMW i5 M60, BMW i7, BMW iX, BMW M5 आणि BMW XM यांसारखी अनेक प्रीमियम व इलेक्ट्रिक वाहने कंपनी पूर्णपणे तयार युनिट्सच्या स्वरूपात भारतात विकते.

दरम्यान, कंपनीने ग्राहकांसाठी BMW Summer Service Campaign 2026 देखील सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत एसी सिस्टम, टायर आणि बॅटरी तपासणीसह अनेक मोफत सेवा दिल्या जात आहेत. तसेच एसी फ्युमिगेशन, रिपेअरिंग आणि इतर व्हॅल्यू-अॅडेड सेवांवर विशेष सवलतींचीही घोषणा करण्यात आली आहे.

त्यामुळे BMW किंवा MINI कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी 1 जुलैपूर्वी बुकिंग किंवा खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. दरवाढ लागू झाल्यानंतर अनेक मॉडेल्सच्या किंमतींमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!