लोणी काळभोर पोलीस काय करतायेत? कुंजीरवाडी सोरतापवाडीत चोरट्यांनी तीन दुकाने फोडली, चोरटे सीसीटीव्हीत कैद..


उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कलागोविंद कार्यालयाशेजारी असलेले एक स्नॅक्स सेंटर चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना बुधवारी (ता. २) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. चोरी करून पळून जाताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे मेडिकल व हार्डवेअर दुकान फोडून चोरट्यांनी मंगळवारी (ता. १) रात्री रोख रक्कम चोरून नेली होती. ही घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. लोणी काळभोर पोलीस काय करतायेत?, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश मुकिंदा चौधरी (वय २६, रा. वडाचीवाडी, नायगाव-पेठ, ता. हवेली) यांचे सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कलागोविंद कार्यालयाशेजारी एक स्नॅक्स सेंटर आहे.

चौधरी यांनी नेहमीप्रमाणे बुधवारी (ता. २) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्नॅक्स सेंटर बंद केले आणि गुरुवारी (ता. ३) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचे शटर उचकटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महेश चौधरी यांनी स्नॅक्स सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली.

चोरट्यांनी गल्ल्यातील १० हजार रुपयांच्या रोकडसह दुकातानील कोल्ड्रिंक्स व इतर सामान चोरून नेल्याचे निदर्शनास आले आहे. महेश चौधरी यांनी सीसीटीव्हीमध्ये पहिले असता, त्यांना चार चोरटे चोरी करून दुचाकीवरून पळून जाताना निदर्शनास आले. याबाबत अद्याप लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!