‘उरुळीकांचन’ला पहाटे पोलिसांच्या रुपाने देवदूत अवतरले! मजूरीसाठी भटकत असलेल्या दांपत्यांवर उद्भवला प्रसुतीचा भयानक प्रसंग; पोलिस व स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावरच सुखरुप प्रसुती….


जयदिप जाधव

उरुळीकांचन : पहाटे २.४५ वाजण्याची वेळ .. रस्त्यावर प्रसूतीच्या वेदना असह्य झालेली महिला .. परगावावरुन मजूरीसाठी आलेले दांपत्य .. मदतीसाठी कोणाकडे धावा घ्यायचा म्हणून निर्माण झालेला कठिण प्रसंग ..अखेर ११२ पोलिस सहाय्यता क्रमांकावर साधलेला संपर्क .. या संपर्कातून घटनास्थळी धाव घेतलेल्या कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातील भावनेतून त्या महिलेची रस्त्यावरच यशस्वी प्रसुती घडुन बाळ व बाळंतीण प्रसंगातून सुखरुप बाहेर पडल्याची घटना उरुळीकांचन ता.येथील मुख्य तळवाडी चौकात बुधवार (दि.७) घडली आहे.

सोलापूरच्या अडमगाव येथून उपजिविकेसाठी मजूरीच्या शोधात शिंदवणे येथे आलेल्या राजू भगवान काळे व त्यांची पत्नी ज्योती राजू काळे यांच्यावर परिस्थितीने आणलेल्या या दुर्दैवी प्रसंगात उरुळीकांचन पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठ तत्परतेने महिलेचा व बाळाचा जीव वाचल्याचा प्रसंग घडला आहे. मजुरी शोधात या दांपत्याला रोजगार न मिळून उलट अचानक पत्नी ज्योती यांना अचानक प्रसुतीच्या वेदना जाणवू लागल्याने हे दांपत्य वाहनाच्या शोधात शिंदवणे रस्त्यावरील तळवाडी चौकात मदतीला माणूस शोधत होते.

परंतु पहाटेच्या पावणेतीनच्या वेळेत या अनोळखी असलेल्या या भागात मदतीला कोन धावून येत नसल्याने हे दांपत्य मदतीच्या प्रतिक्षेत भांबावून गेले होते. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास वाहन मिळत नव्हते तर मदतीला कोन धावत नसल्याने अखेर या महिलेच्या पती राजू याने उद्मवलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी ११२या पोलिस साहाय्यता क्रमांकावर संपर्क साधून मदतीसाठी याचना केली. हा सहाय्यता क्रमांक थेट उरुळीकांचन पोलिस ठाण्यात धडकला गेल्याने पोलिस ठाण्यात हजर असलेल्या पोलिस हवालदार दत्तात्रय गाडेकर व ठाणे अंमलदार राहुल आव्हळे यांनी तात्काळ प्रसंग ओळखून घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर रुग्णवाहिका मिळावी म्हणून सुरू झालेला प्रयत्न व पहाटेची वेळ या वेळेत रुग्णवाहिका मिळत नसल्याची कल्पना येताच पोलिस कर्मचाऱ्यांनी स्थानिकांची मदत घेत महिलेला खाजगी वाहनाने हलविण्याचा प्रयत्न केला.मात्र महिलेची प्रसूती होण्याची वेळ उद्भवल्याने रस्त्यावरच स्थानिकांच्या मदतीने कपड्यांचा आडोसा घेत महिलेची रस्त्यावरच प्रसूती केली.

पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या कर्तव्याच्या भावनेतून व स्थानिकांनी दाखविलेल्या मदतीतून या महिलेची प्रसूती यशस्वी झाली असून बाळ व बाळंतीण सुखरूप स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस कर्मचारी दत्तात्रय गाडेकर व राहुल आव्हळे यांनी दाखविलेल्या कर्तव्याच्या भावनेतून या दांपत्याला झालेली अर्थिक मदतही देऊ करुन संकटाला मोठी आधार ठरली आहे. या प्रसूतीच्या रुपाने दांपत्याला पुत्रप्राप्ती झाल्याने या दांपत्याचा आनंद गगणात सामावेश करावा असा झाला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!