पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या अन् जमावाने ठार मारले, पोलीस निरीक्षकासह ३ कर्मचारी निलंबित, २० जणांना अटक, नेमकं काय घडलं?


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. दरम्यान, कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या आरोपावरून जमावाने एका व्यक्तीची बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकणी आता चौकशीत विलंब केल्याबद्दल तीन पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंगळूर ग्रामीण पोलिस निरीक्षक शिवकुमार, हेड कॉन्स्टेबल चंद्रा पी. आणि कॉन्स्टेबल एल्लालिंगा यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे.

तसेच २७ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास स्थानिक क्रिकेट स्पर्धेदरम्यान प्रक्षोभक घोषणा देणाऱ्या एका व्यक्तीवर काही लोकांच्या गटाने हल्ला केला. त्यात तो मृत पावला. नंतर त्याची ओळख अशरफ म्हणून झाली. जो केरळमधील वायनाड जिल्ह्यातील रहिवासी होता.

दरम्यान, प्राथमिक तपासाचा हवाला देत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित व्यक्तीजवळ एक पिशवी सापडली. शेतातून जात असताना त्याने ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यानंतर काही व्यक्तींच्या गटाने त्याच्यावर हल्ला केला. त्याला लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. लाथा मारत आणि वारंवार मारहाण करण्यात आली. उपस्थितांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो मरण पावला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!