राज्यात SC आरक्षणाबाबत होणार मोठा बदल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, जाणून घ्या…


मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण लागू करण्याचे महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरणास मान्यता देण्यात आली असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत महाराष्ट्रात याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

तसेच महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या आरक्षणामुळे मोठा बदल करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणाच्या निकालादरम्यान एससी आरक्षणामध्ये उपवर्गीकरणास मान्यता दिली आहे. त्यानुसार आता महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी आज केली आहे.

एका मुलाखतीत फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनासह विविध जातींचे आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनावर भाष्य करताना फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत.

ते म्हणाले, ओबीसीमध्ये क्रिमीलेअरची व्यवस्था आहे. ओबीसीतील एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्याला आरक्षणाला लाभ मिळत नाही. आरक्षणाचा लाभ नॉन क्रिमीलेअर वर्गाला मिळू शकतो.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने क्रिमीलेअर आणि नॉन क्रिमीलेअरची स्पष्ट व्याख्या केली आहे. कोर्टाने एका आदेशामध्ये अनुसूचित जातीमध्ये क्रिमीलेअरचा फॉर्म्यूला लागू करण्याबाबत म्हटले आहे. अनुसूचित जातींमध्येही प्रत्येक राज्यात एका जातीचे प्रभुत्व असून त्यांना आरक्षणाचा अधिक फायदा मिळतो.

त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीमध्ये आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याबाबत भाष्य केले आहे. कारण अनेक जातींना आरक्षणाचा योग्य लाभ मिळत नाही, असे फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील दोन-तीन महिन्यांत अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करण्याबाबत स्पष्ट संकेत दिले.

ते म्हणाले, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उपवर्गीकरणाबाबत एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यावर ही समिती काम करत असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत ते लागू केले जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!