ये बाबुराव का स्टाइल है!! हेराफेरी 3 बाबत चाहत्यांना मिळाली आनंदाची बातमी, चाहत्यांची उत्सुकता शिगेला..

मुंबई : हेराफेरी 3 हा चित्रपट मागच्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची जोडी धमाका करताना दिसणार आहे.
नुकतीच या चित्रपटाबाबत सुनील शेट्टी यांनी मोठी अपडेट शेअर केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील व आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत सुनील शेट्टी म्हणाले की, सप्टेंबर मध्ये आम्ही हेराफेरी 3 ची शूटिंग सुरू करणार आहोत.
विशेष म्हणजे आम्ही सर्वजण हेराफेरी 3 ची शूटिंग करण्यासाठी उत्साहात आहोत. याचा प्रोमो देखील आम्ही काही दिवसांपूर्वी शूट केला आहे. असं सुनील शेट्टी म्हणाले आहेत.
त्याचबरोबर पुढे ते सुनील शेट्टी म्हणाले, की, मी अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या नेहमी संपर्कात असतो. त्यामुळे आता चित्रपटाच्या शूटिंगची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. हेराफेरी ३ चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक नक्कीच आहे. त्यामुळे चाहते देखील या चित्रपटाची वाट पाहत आहेत.
संजय दत्तही दिसणार या चित्रपटात
हेराफेरी 3 या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे तिन्ही अभिनेते महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. मात्र याचबरोबर अजून एक महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.
ही महत्त्वाची भूमिका अभिनेते संजय दत्त साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वीच आलेल्या रिपोर्टनुसार हेराफेरी 3 या चित्रपटांमध्ये संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.