अखेर प्रतीक्षा संपली!’ या’ दिवशी सुरू होणार’ बिग बॉस मराठी 6′ ,नवा प्रोमो समोर

पुणे:मागचा सीझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तयार! या नव्या प्रोमोने बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा बिगुल वाजला आहे.तसेच हा शो कधीपासून सुरू होणार हे सुद्धा समोर आलं आहे. येत्या 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू होणार आहे.त्यामुळे सगळीकडे उत्साहाची लाट उसळली आहे
‘स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय’ म्हणत रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी सिझन ६. नव्या प्रोमोमुळे महाराष्ट्रात एकच चर्चा, एकच विषय घोळतोय तो म्हणजे बिग बॉस मराठी सिझन ६. रितेशचा हटके लूक, दमदार स्वॅग प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. ‘मागचा सीझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय…आहात ना तय्यार!’ रितेशच्या या वाक्यानं प्रेक्षकांची धडधड अजूनच वाढली आहे आणि त्यामुळे नव्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


‘बिग बॉस मराठी ६’च्या प्रोमोमध्ये रितेशच्या एन्ट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीचं वातावरण, ढोल–ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल २५० ते ३०० लोकांची दणदणीत उपस्थिती दिसून येत आहेत. रितेशने पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषा केली आहे. या नव्या प्रोमोने बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा बिगुल वाजला आहे.

याआधी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाने धुमशान घातलं. आता यंदाच्या सीझनमध्ये कल्ला तोच असणार आहे, पण पॅटर्न रितेशचा असणार आहे. काय पॅटर्न असणार? कसा लूक असणार? सदस्य कोण असणार? सगळं अद्याप गुलदस्त्यात आहे. याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या बिग बॉस मराठी सीझन 6 च्या प्रोमोमधले रितेशचे कडक डायलॉग… ‘घरात कुणाचा नवस पूरा होणार? तर कुणाच्या सलामीने वातावरण झिंगणार? ‘काही असे ही असणार… पण, मी गप्प नाही बसणार…!’ असे हटके डायलॉग प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहेत.
