उरुळीकांचन परिसर हे हातभट्टी दारू निर्मितीचे पूर्वापार मोठे केंद्र! रसायुक्त दारूची घातक निर्मिती! वरिष्ठ व स्थानिक पोलिस दलातील आशिर्वाद कारणीभूत…

जयदिप जाधव

उरुळीकांचन : पुण्यात विषारी दारुविक्रीने १८ जणांचा बळी गेल्यानंतर शहरात ग्रामीण भागातून हातभट्टी युक्त दारुची निर्मिती होऊन विक्री होत असल्याची बाब उघड झाली आहे. या दारुविक्री व पुरवठ्याला उरुळीकांचन येथून दारुपुरवठा होणे हे कनेक्शन अनेक वर्षापासून उघड असून अवैद्य धंद्यांवाल्यांसोबत स्थानिक व वरिष्ठ पातळीवरील पोलिस प्रशासनाचे लागेबंधांतून या भागात रासरोसपणे अवैद्य हातभट्ट्या चालविल्या जात असून पुणे शहर तसेच स्थानिक गुत्यांवर या ठिकाणाहून हातभट्टी दारुपुरवठा सुरू आहे.
उरुळीकांचन व शिंदवणे परिसरातून हातभट्टी दारू निर्मितीचे मोठे केंद्र असून रासरोसपणे हजारो लिटर रसायनयुक्त हातभट्टीचा पुरवठा शहर व स्थानिक गुत्यांवर सुरू आहे. विशिष्ट समाजातील ‘भाऊ’ ‘दादा’ व ‘ताई’ या अवैद्य हातभट्ट्या दारुची निर्मिती करणारे ‘खालसा’ होत नसल्याने अतिरिक्त दुरगंधीयुक्त व रसायनयुक्त हातभट्टी दारुची रासरोसपणे निर्मिती होत आहे. या दारुनिर्मितीत रसायन युक्त स्पिरीट द्राव्याचा सामावेश असल्याने दारुचे विषारी घटकांत रुपांतरीत होण्याची शक्यता असल्याने हे विषारी द्राव्य जिवितास हाणीकारक असल्याची शक्यता अधिक आहे.

उरुळीकांचन व शिंदवणे परिसरात रासरोसपणे ह्या हातभट्टी दारुच्या कडई निखारा देऊन उकळल्या जात असून हजारो लिटरची दारु या ठिकाणाहून विक्रीसाठी बाहेर पडत आहे. या ठिकाणी दारु निर्मितीसह विक्रीसाठी प्रशस्त व्यवस्था स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातून होत असून भरभक्कम कमाईचे स्त्रोत या ठिकाणाहून वरिष्ठ व स्थानिक पातळीवर विभागले जात असून या दारुच्या निर्मितीला व पुरवठ्याला अर्थिक रसद कारणीभूत ठरत आहे.

उरुळीकांचन परिसरात एका विशिष्ट वस्तीवर रासरोसपणे या हातभट्ट्या उकळी देऊन सामाजिक त्रासाचे भान न बाळगता निसंकोचपणे सुरु असल्याने हातभट्टी दारुची निर्मिती करणाऱ्यांची बिशेष बडदास्त ठेवली जात असल्याचे उघड आहे. या दारुनिर्मिती करणाऱ्यांची प्रशासकीय साखळी घट्ट असल्याने दारुचे फंटे व फुगे कसल्याही प्रकारचे अडथळे न होता पुण्यात पोहचत असल्याची चर्चा असून या दारुधंद्याविरोधात अनेक वर्षे अतिशय जुजबी कारवाई करुन मुख्य धेंड्यांनासोडून कामगारांना पुढे करुन धातुर मातुर कारवाई दाखवून प्रशासन या धंदेवाल्यांना उघड पाठबळ देत असल्याचे उघड आहे.
कारवाया फक्त नावापुरत्याच…
उरुळीकांचन परिसरात हातभट्टी दारुनिर्मितीचे मोठे केंद्र असून या ठिकाणाहूनच पुणे शहरातील विविध भागांत हातभट्टी दारु पुरवठा होत असल्याची बाब उघड आहे. मात्र प्रशासकीय आर्शिवाद व कमाईचे मोठे साधन असल्याने या ठिकाणी दारुची निर्मिती होण्यास विशिष्ठ व्यवस्था निर्माण केली आहे. मोठ्या प्रमाणात ही दारु मानवी प्रकृतीस घातक असून देखील अर्थिक उत्पन्न यंत्रणेला मिळून देत असल्याने फक्त नावापुरती कारवाई करुन या धंद्याना संरक्षण देण्याची प्रथा रूढ झाली आहे.