उरुळीकांचन -शिंदवणे रस्त्यावर बेधुंद टेम्पो चालकाचा थरार ! स्टेअरींगवर दारुचे चुस्का मारीत ड्रायव्हिंग ; टेम्पो पलटी होऊन महिलेची प्रकृती चिंताजनक …!!

उरुळी कांचन : टेम्पोच्या स्टेअरींगवर दारुचा चुस्का मारीत वाहन
चालविणाऱ्या टेम्पो चालकाने टेम्पो नशेत चालवून टेम्पो पलटी
करुन चौघांच्या जिवेतेला धोका निर्माण करण्याचा प्रकार
उरुळी कांचन – शिंदवणे रस्त्यावर उघडकीस आला आहे. या
टेम्पो चालकाचा नशेत वाहन चालविल्याने एका महिलेची प्रकृती
चिंताजनक बनली आहे.
उरुळीकांचन – शिंदवणे रस्त्यावर टम्पोचालकाने नशेत
हा प्रकार केला असून चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. तर एक महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी (ता. 02) हा बेधुंद टेम्पो चालक दारुचे घुटके पित शिंदवणे दिशेने जाताना
हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालकाची चिकित्सा करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रत्यक्षदर्शींनी केली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक व प्रवाशांनी
धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढले. तत्काळ कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून सर्व जखमींना उरुळी कांचन येथील सिद्धीविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.