सुरक्षारक्षकास पिस्तुलचा धाक धाकवून कारची चोरी, उरुळी कांचन परिसरात खळबळ
उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून कार चोरून नेल्याचा प्रकार सोरतापवाडी येथून समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
येथील शिव मोटर्स कार बजारात आज पहाटे साडेचार वाजता चोरीचा हा प्रकार घडला आहे. फिर्यादी झरांडे यांचे सोरतापवाडी येथे कारबाजारात शिव मोटर्स हे कार खरेदी विक्रीचे दुकान आहे.
आज पहाटे साडेचार वाजता या कारबाजारात तीन अज्ञात चोरटे आले. धारदार हत्यारे व बंदूक जवळ असलेल्या चोरट्यांनी काराबाजारात असलेल्या निवृत्ती देवके या सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावली आणि स्विफ्ट डिझायर गाडी चोरून नेली. चोरट्यांनी स्विफ्ट डिझायर गाडी नं. MH12-HZ- 3737 कार चोरून नेली आहे.
याबाबत शिव मोटर्स चे मालक महादेव विठ्ठल झरांडे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर तत्काळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.