‘व्हाइस ऑफ देवेंद्र’ या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेला अखेर स्थगिती, रोहित पवार आक्रमक झाल्यानंतर प्रशासन झुकले…

पुणे : पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने पुणे अहिल्यानगर व नाशिक मधील सर्व संलग्न महाविद्यालयांना पत्र पाठवत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ देवेंद्र या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आग्रह करावा अशा स्वरूपाचे पत्र पाठवले होते. मात्र याबाबत आमदार रोहित पवार आक्रमक झाले होते.

यावरून आमदार रोहित पवार यांनी विद्यापीठासह शिक्षण विभागाला घेरले आहे. यामुळे आता व्हाइस ऑफ देवेंद्र’ या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेला झालेल्या विरोधानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपलं पत्र मागं घेण्याची उपरती झाली.
पण ‘एकीकडं व्हाइस ऑफ देवेंद्र’ राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजन केलं नाही असं म्हणायचं आणि दुसरीकडं राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत काढलेलं पत्र मागे घ्यायचं, हा विद्यापीठाचा दुटप्पीपणा आहे. अशी डबल ढोलकी वाजवून छुप्या पद्धतीने आपला राजकीय अजेंडा राबवणं, योग्य नाही.

शिक्षणाचं मंदिर असलेल्या विद्यापीठाच्या माध्यमातून राजकीय अजेंडे राबवण्याचा विषय हा केवळ या स्पर्धेपुरता मर्यादित नाही तर असे अनेक विषय आहेत, महिन्याअखेरपर्यंत विद्यापीठातील या राजकीय अजेंड्यांच्या संदर्भातील सर्व विषयांची पोलखोल करू. असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचे नसते, याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो. निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंटप्रमाणे काम करत असल्याचे संपूर्ण देश बघत आहे, आता शिक्षणाची मंदिरे असलेली विद्यापीठे देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा?, असे ते म्हणाले आहे.
विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच Voice of Democracy मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील. अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. अखेर याबाबत निर्णय मागे घेतला आहे.