सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता भाजप आमदाराच्या बँकेतून होणार!! मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, कोणती आहे ती बँक?


मुंबई : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर गुरुवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती आता मुंबै बँकेत उघडण्यात येणार आहेत. मुंबै बँक भाजपच्या ताब्यात असून भाजपचे आमदार प्रविण दरेकर याचे अध्यक्ष आहेत. तर दरेकर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.

तसेच राज्य सरकारच्या अखत्यारित येणारी महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधीची गुंतवणूक करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रालयातील आजच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्रालयात एफआरएस तंत्रज्ञान बसविण्यासंदर्भात चर्चा झाली. सहाव्या मजल्यावर अभ्यंगत आणि इतरांना प्रवेश द्यायचा की नाही यासंदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मंत्रालयात अभ्यंगताकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जातोय या संदर्भात चर्चा झाल्याचे समजते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!