सावधान! राज्यात बर्ड फ्लूचा धोका वाढला, कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह, आता चिकन-अंडी करताना अशी घ्या काळजी..

धारशिव : राज्यात बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. वाशीम जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग आढल्याने खळबळ उडाली. त्यानंतर आता वाशिम जिल्ह्यानंतर आता धारशिवमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. धाराशिवच्या ढोकीमध्ये बर्ड बारा कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यामुळे पशुसंवर्धन विभागाने हालचाली वाढवल्या आहे. धाराशिवच्या ढोकी परिसरामध्ये ५०च्या आसपास कावळ्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता.
तसेच धारशिव जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणच्या ३०० पेक्षा अधिक कोंबड्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. धारशिवच्या पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते.
दरम्यान, कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने कोंबड्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. आता कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
अंडे-चिकन करताना अशी घ्या काळजी..
चिकन आणि अंडी ७० डिग्री सेल्सियस तापमानात शिजवून घ्या.
कच्ची इन्फेक्टेड अंड्यांचे सेवन करु नका.
चिकन शिजवल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्या.
बर्ड फ्लूचा प्रभाव असलेल्या १० किलोमीटर परिसरात राहू नका.
सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंग दुखणे अशी लक्षणे असल्यावर रुग्णालयात जा.
पक्षी किंवा इतर प्राण्यांचा मृत्यू झाल्यावर त्याची माहिती पशूसंवर्धन विभागाला द्या.