भाजपच्या माजी नगरसेवकांच राजकीय भवितव्य टांगणीला, कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला….


पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.प्रभागातील युवक राहुल धोत्रे यांच्या खून प्रकरणी त्यांना जामीन देण्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आता त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यापासून भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे प्रभागातील युवक राहुल धोत्रे यांच्या खून प्रकरणी अटकेत आहेत. या प्रकरणी त्यांना जामीन मिळण्यासाठी त्यांचे अधिक प्रयत्न सुरू असताना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला. दुसऱ्यांदा जामीन नाकारल्याने आणखी काही दिवस त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे. त्यामुळे निमसे यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान राहुल धोत्रे यांच्या खून प्रकरणात माजी नगरसेवक निमसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्या विरोधात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाली. यावरून शहरात मोठे राजकारण अद्यापही सुरू आहे. आता त्यांचा जामीन नाकारल्याने भाजपलाही मोठा धक्का बसला आहे.

माजी नगरसेवक निमसे यांना अटक झाल्याने महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी देता आली नाही. भाजपने त्यावर तोडगा म्हणून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली होती. या प्रभागातून त्यांच्या मुलासह भाजपचे सर्व चार नगरसेवक निवडून आले आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!