यशवंत’ ची जमिन विक्री बाजार समितीला करुन कारखाना सुरू करण्याचा एकमेव पर्याय ! कारखाना सुरू करण्याचे इतर सर्व रस्ते बंद – अध्यक्ष सुभाष जगताप

जयदिप जाधव उरुळी कांचन : सभासद , कामगार देणी तसेच यांत्रिक दुरुस्ती करण्यासहीत कारखाना सुरू करण्यासाठी भाग -भांडवल उभे करण्यासाठी केंद्र व राज्य पातळीवर कारखाना कर्जासाठी पात्र ठरत नसल्याने सर्व पर्यायसंपल्याने कारखान्याची ९९.२७ एकर जमीनीची विक्री करुन कारखाना सुरू करण्याचा हितास प्राधान्य दिले आहे. कारखान्याची सद्यस्थितीत २२३ एकर जमीन ही पूर्णतः हा राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असून सर्व देणी मिळून कारखान्यावर सरफेसी ऍक्टखाली ‘ डीआरटी ‘ न्यायालयाचे जप्तीचे आदेश बँकांना प्राप्त झाले आहे. या परिस्थिती संचालक मंडळाने राज्य शासनाच्या माध्यमाने बँकांशी चर्चा करुन एकरकमी कर्जफेडीचा प्रस्ताव दिले आहेत. कर्जफेडीसाठी बँकांची परवानगी घेऊन ही विक्री प्रक्रिया राबविण्याची तयारी संचालक मंडळाने करुन या संस्थेला बुडत्यापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्टीकरण ‘यशवंत’ कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी केले आहे.

थेऊर (ता.हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा बुधवार ( दि.२६) आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या उपस्थित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत कारखान्याच्या सद्यस्थितीचे अवलोकन संचालक मंडळाने करुन सभेच्या पार्श्वभूमीवर सर्व माहितीचा खुलासा संचालक मंडळाने केला आहे. या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष किशोर उंद्रे, ज्येष्ठ नेते व बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप, प्रताप गायकवाड, बाळासाहेब चौधरी ,बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड, कारखान्याचे संचालक ताराचंद कोलते, राहुल घुले, विजय चौधरी, सुशांत दरेकर, अमोल हरपळे, मोहन म्हेत्रे, दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.
कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले की , यशवंत कारखान्याची निवडणूक न्यायालयात जाऊन सभासदांनी लावल्यानंतर खऱ्या अर्थाने यशवंत कारखान्याचा कामकाजाला सुरुवात झाली आहे. कारखान्याकडील महत्त्वाची कागदपत्रे जिर्ण झाल्यानंतर शक्य तेवढ्या कागदपत्रे एकत्रित करून कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळाने कसोशीने प्रयत्न केले आहे. या

सर्व गोष्टीत राज्य शासनामार्फत कारखान्याला भरीव मदत होत असल्याचे त्यांनी सांगून अशक्यप्राय आव्हान घेऊन संचालक मंडळ राज्य सहकारी बॅक ५७.१७ कोटी, बॅक ऑफ बडोदा , कुंजीरवाडी शाखा ४१.०१ कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया उरुळीकांचन २७.०९ कोटी, बँक ऑफ इंडिया , थेऊर २२.६७ कोटी तसेच पीडीसीसी बँक २८ लाख रुपये मिळून १४८ .२२ कोटी इतकी देणी आहेत. मात्र कारखान्याने वरिष्ठनेते मंडळीच्या सहकार्यातून ३६ कोटी ५३ लाख इतक्या किंमतीत सर्व बँकांची ओटीएस मधून परतफेड करणार असल्याचे निश्चित करुन बॅकेचा विक्री परवानगी मिळविण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे कारखान्याचे थकित कर्ज व व्याजापोटी ११२ कोटी रुपये माफ करण्याचे निर्णय घेतले आहे.

त्यासाठी कारखान्याकडे इतर कर्ज उपलब्धीतीचे पर्याय नसल्याने जमिन विक्री बाजार समितीला करुन ९९.२७ विक्रीचा पर्याय सभासदांपुढे ठेवणार आहे. कारखान्याकडे ओटीएस कर्ज फेड करण्यासहीत ड्यु-डिलीजन्स अहवालानुसार २८ कोटी रुपये कारखान्याची मालमत्ता चोरी करुन मालमत्तेतून नुकसान झाल्याचा अहवाल मिळविला आहे. तसेच सभासद देणी ३५ .१६ कोटी, कामगार देणी १८ कोटी रुपये रक्कम थकीत आहे. ही रक्कम संचालक मंडळ वितरीत करण्याचा प्रयत्न पुढील काळात करणार आहे.
कारखान्याला जमीन विक्रीच पर्याय
कारखान्याची जमिन विक्रीची परवानगी यापूर्वी सभासदांनी दिली असली तरी शासन नियुक्ती कमिटी व प्रशासकीय संचालक मंडळाने यापूर्वी निर्णय घेऊन १२ वेळा जमीन लिलाव प्रक्रिया होऊ शकली नाही. मात्र पुणे बाजार समितीने एकमताने कारखाना वाचविण्यासाठी ९९.२७ एकर जमीन खरेदी करुन कारखान्याचा संचालक मंडळाच्या मदतीला धावली आहे. त्यामुळे बाजार समिती माध्यमातून रोजगार, अर्थिक उलाढाल व बाजारपेठेला वाव मिळणार असल्याचे ते म्हणाले.
जमिन विक्रीचा तिसऱ्यांदा ठराव
कारखाना सुरू करण्यासाठी सभासदांनी यापूर्वी सर्वसाधारण सभेस परवानगी दिली आहे. परंतु चालू जमिन विक्री प्रक्रियेत पणन संचालकांनी जमीन विक्रीचा प्रस्ताव फेटाळल्याची चर्चा ही फक्त दिशाफूल करणारी आहे. प्रस्ताव तयार केला असला तरी अद्याप दाखल केला नसल्याचे स्पष्टीकरण संचालक मंडळाने दिले आहे. या ठरावात जमिन विक्री फक्त पुणे बाजार समितीला होणार असून खाजगी बिल्डरच्या वावड्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. कारखान्याचा जमिन विक्रीचा व्यवहार पारदर्शक होऊन सभासदांपुढे होणार आहे. या सर्व प्रक्रियेला तसेच ११२ कोटी बँकेचे वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके, दौंडचे आमदार राहुल कुल ,जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद यांचे सहकार्य झाल्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी सांगितले.