खरातच्या कारनाम्याच गूढ उकलणार ; प्रतिभा चाकणकर पोलीस ठाण्यात हजर, चौकशीतून धक्कादायक खुलासा…


पुणे: महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचे देखील चौकशी होणार आहे. यासाठी प्रतिभा चाकणकर आज शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या आहेत.त्यामुळे अशोक खरातशी संबंधित 132 खात्याचं गूढ उकलणार का, याची चर्चा सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातशी संबंधित सर्व राजकीय व्यक्तींची कसून चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता समता पतसंस्थेतील बहुचर्चित 142 संशयास्पद खात्यांच्या प्रकरणात ही मोठी कारवाई मानली जात आहे. अशोक खरात नॉमिनी असलेल्या या खात्यांमधून झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारप्रकरणी पोलिसांनी चाकणकर यांची चौकशी सुरू केली आहे.

प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर असलेल्या या चार खात्यांमधून आतापर्यंत तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. इतकी मोठी रक्कम खात्यात कोठून आली आणि या व्यवहारांचे स्वरूप काय होते, या दिशेने शिर्डी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान त्यांचे अशोक खरात यांच्याशी त्यांचे काय संबंध आहेत आणि या व्यवहारांमागील सत्य काय आहे, हे त्यांच्या जबाबानंतर स्पष्ट होणार आहे. चाकणकर पोलिसांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिभा चाकणकर यांच्या माहितीमुळे पोलिसांच्या तपासाला आणखी वेग येणार का, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!