लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! योजनेसंदर्भात सर्वात महत्वाची माहिती आली समोर…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक बोगस लाभार्थींनी घेतल्याचे समोर येत आहे, असे बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सरकारने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. योजनेचा आर्थिक भार तिजोरीवर प्रचंड वाढल्यामुळे महायुती सरकारने आता निकष कठोर केले आहेत.
याचाच भाग म्हणून, राज्य सरकारने या योजनेसाठी अतिशय महत्त्वाचा नवा नियम लागू केला आहे. यामुळे योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. आता या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थीसोबतच त्या महिलेचे पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न किती आहे, याचीही आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे. जर महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचे उत्पन्न शोधले जाणार आहे. लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल.

लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावा, अशी मुख्य अट आहे. अनेक पात्र झालेल्या महिलांचे उत्पन्न कमी आहे. मात्र लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न याचीही चौकशी केली जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे, ही मुख्य अट आहे. याआधी केवळ लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यात आले होते. यात गृहिणी तसेच अनेक महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर नव्हते.
मात्र, अनेकदा कुटुंबाचे एकूण उत्पन्न जास्त असूनही केवळ महिलांचे उत्पन्न कमी दाखवून योजनेचा लाभ घेतला जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. हे टाळण्यासाठी आणि खऱ्या गरजू महिलांनाच लाभ मिळावा यासाठी, राज्य सरकारने आता कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे