लोणीकाळभोरला ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ कलाष्टमी सोहळा उत्साहात संपन्न; शाही मिरवणुकीत ग्रामस्थ उत्सहात सहभागी….


लोणी काळभोर : येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ काळभैरवनाथाचा कालाष्टमी जन्मोत्सव सोहळा अंबरनाथ मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध धर्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने अंबरनाथाचे मंदिर सजविण्यात आले होते. बुधवार १२ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता श्रीमंत अंबरनाथ व माता जोगेश्वरीला भाविकांच्या उपस्थितीत महामस्तकाभिषेक करण्यात आला. सकाळी ७ ते ९ या दरम्यान १०१ दांपत्याच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक व होम हवन पार पडले. सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान सिताराम भजनी मंडळ व राजस्थानी भजनी मंडळाच्या वतीने श्री तुलसीदास रामायणाचे पठण तसेच श्रीमंत अंबरनाथ भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला.

दुपारी १२ वाजता सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी ६ वाजता मंदिरात हजारो दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. रात्री दहा वाजता हभप दत्तात्रय महाराज काळभोर यांचे जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन झाले. मध्यरात्री बारा वाजता श्रीमंत अंबरनाथाचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंदिरावर विद्युत रोषनाई व परिसरात फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात आली.

आज गुरुवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या काळात श्रींची पारंपारिक शाही मिरवणूक ढोल, ताशे व बॅन्डच्या सुमधूर आवाजात गावातून काढण्यात आली. यावेळी कन्या प्रशाला व पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम सादर केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला व तरूणी मंगलकलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. दुपारी १२ ते ४ या वेळेत रामेश्वर सारडा व राजू चौधरी यांच्या वतीने भाविक भक्तांना

महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या दोन्ही दिवसभर मंदिर भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन लोणी काळभोर ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट व श्रीमंत अंबरनाथ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येणार आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!