लाडक्या बहिणींना सरकारच भाऊबीजेचं गिफ्ट ; 1500 चा हप्ता तर मिळणारच अन ई-केवायसी प्रक्रियेलाही स्थगिती….


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने भाऊबीजेच्या तोंडावर लाडक्या बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे महिलावर्गाची नाराजी दूर सारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलावर्गाची नाराजी दूर सारण्यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट २०२५ पर्यंत १४ हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. सप्टेंबरसाठी निधी उपलब्ध झाल्याने लवकरच प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात १५०० रुपयांची रक्कम जमा होईल, असे अपेक्षित आहे. याचबरोबर आता ऑक्टोबर महिन्याचा ही हप्ता लवकरच जमा होणार आहे., सहा महिन्यांच्या कालावधीनंतर निकषांच्या पूर्ततेची कसून तपासणी सुरु झाली. लाभार्थ्यांच्या छाननीत चारचाकी वाहनधारक महिला, केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या ‘बहिणी’, शासकीय सेवेतील कर्मचारी, तसेच एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी भगिनींना या योजनेतून वगळण्यात आलं होतं. वयाची चुकीची नोंद किंवा निकषांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांनाही यातून बाजूला सारण्यात आलं. त्यामुळे सुमारे ४५ लाख लाडक्या बहिणींचा धक्का बसला होता. मात्र या योजनेतील केवायसी ला स्थगिती देण्यात आली आहे.

सध्या ई-केवायसीद्वारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असलेल्या महिलांचा शोध सुरु होता. यात महिलेच्या वडिलांसह पतीच्या कमाईचीही खातरजमा केली जात आहे. त्यामुळे ७० लाखांहून अधिक महिलांना अपात्र ठरण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. परंतु महायुती सरकारने तूर्तास स्थगिती देत टांगती तलवार दूर केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!