शेतकऱ्यांना सरकारने फसवलं! निवडणूक होताच हातात आली थकित बिले, जाणून घ्या…


कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची मते घेण्यासाठी एप्रिल ते जून २०२४ अखेरपर्यंतची साडेसात अश्व शक्तीपर्यंतच्या सर्व कृषी पंपधारकांना वीज बिले शासनाने शून्य करून दिली, परंतु आता डिसेंबरपासून पूर्ववत पोकळ थकबाकीसह बिले दिली आहेत. यामुळे याकडे सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारने सांगितले आहे की, आता आणि पुढील पाच वर्षे कृषिपंपाचे वीज बिल भरायचे नाही. पण मोफत वीज मिळणार का? हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यांच्या विभागांतर्गत हा विषय येतो, असे म्हणत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी हात झटकले आहेत.

यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना येत असलेल्या थकित बिलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले. विधानसभा निवडणूक संपताच शेतक-­यांना थकबाकी असलेली बिले मिळत आहेत. त्यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोट केले आहे.

यामुळे आमची फसवणूक झाल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक योजना सरकारने सुरू केल्या. याबाबत माहिती अशी की, गेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी साडेसात अश्वशक्तीपर्यंतचे थकीत आणि चालू वीज बिल माफ, अशी घोषणा केली.

नंतर निवडणूक असल्यामुळे याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यानंतरचे तीन महिन्यांचे कृषी पंपाचे वीज बिल शून्य दिले. कृषी पंपधारक बिलावर थकीत रक्कम नाही, चालू बिलही शून्य आहे, हे पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र पुढे जाऊन असे काही होईल याबाबत शेतकऱ्यांना माहिती नव्हते.

असे असताना महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले. यावेळी देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाले आहेत. अर्थमंत्री त्यावेळचेच आहेत. तरीही, कृषी पंपधारकांना वीज बिल थकबाकीसह दिले आहे. यामुळे कृषी पंपधारकांची फसवणूक झाल्याचे अनेकांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!