महायुतीचा फॉर्म्यूला ठरला ; भाजप, शिवसेना अन राष्ट्रवादी निवडणुकीत…..


पुणे : राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता, या निवडणुका प्रचंड प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत महायुतीत तीनही पक्ष स्वबळावर लढणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबईमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर ठाणे महापालिका निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढता येईल का? याची चाचपणी होणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे. विरोधकांना जिथं फायदा, तिथं महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार, असंही फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक आणखीन चुरशीची ठरणार आहे

दरम्यान महाविकास आघाडीचा देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे राज ठाकरे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत जाणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!