मुख्यमंत्री फडणवीसांच्या लाडक्या मंत्र्याचा कारनामा, स्वत:चे विवस्त्र फोटो महिलेला पाठवले अन्…. घटनेने राज्यात खळबळ

पुणे : भाजपच्या मंत्र्याचा एक धक्कादायकत कारनामा आता समोर आला आहे. या मंत्र्यांने स्वत:चे विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवल्याने आता राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्या महिलेने कारवाईची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘लाडके मंत्री’ असणारे जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण त्या महिलेनं स्वतः उघड केले आहे. तर काहीही संबंध नसताना फक्त आपल्याला बदनाम करण्यासाठी गोरे त्रास देत असल्याचे त्या महिलेचे म्हणणे आहे.
दरम्यान, याबाबत त्या महिलेने थेट राज्यपाल यांच्याकडे धाव घेतली असून याप्रकरणी राज्यपालांना पत्र पाठवले आङे. तसेच आपल्याला मंत्रिमंडळातील एक मंत्री त्रास देत असून त्याची हकालपट्टी करावी, असे जयकुमार गोरे यांचे नाव घेत मागणी केली आहे. तसेच महायुती सरकारने याबाबत योग्य कारवाई न केल्यास १७ मार्चपासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारादेखील त्या महिलेने दिला आहे.
तसेच याच पत्राची एक प्रत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनाही पाठवण्यात आली आहे. या पत्रात त्या पीडित महिलेने संपूर्ण घटनाक्रमाने सांगितला आहे. तर या महिलेने आपण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्याचा दावा केला आहे.
सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार असून त्यांनी 2016 पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचे म्हटलं आहे. तर आपल्याला त्रास देण्यासाठी गोरे यांनी त्यांचे नग्न फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले, असेही त्या पत्रात म्हटलं आहे.
तर होणाऱ्या या त्रासाला कंटाळून सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे. पण अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली होती. ज्यानंतर गोरे यांना दहा दिवसांची जेलवारीही करावी लागल्याचे या पत्रातून सांगितले आहे.
दरम्यान या प्रकरणात त्रास वाढतच गेल्याने बदनामीविरोधात ती महिला जिल्हाधिकाऱ्यांना भेटली होती. तसेच कारवाईची मागणी केली होती. मात्र कारवाई ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षकांकडे बोट दाखवण्यात आले होते.