मोठी बातमी! देशाची अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर घसरली, सरकारचे अपयश आले समोर? सरकारवर होतेय टीका…


मुंबई : जगाची चौथी अर्थव्यवस्था बनण्याचा मार्गावर असलेली आपली अर्थव्यवस्था एका वर्षातच सहाव्या क्रमांकावर घसरली असून युके आणि जपानच्या अर्थव्यवस्थेने आपल्याला मागे टाकले आहे.

गेल्या वर्षी भारत चौथी अर्थव्यवस्था होणार असल्याचा अंदाज IMF ने दिला असता संपूर्ण देशभर स्वतःची वाहवा करून घेणारे केंद्र सरकार आज आपला देश पुन्हा सहाव्या स्थानावर घसरल्याच्या IMF च्या अंदाजावर गप्प का आहे? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकारची धरसोडीची धोरणे त्यांच्या आश्वासनाप्रमाणेच अत्यंत volatile असल्यानेच भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. केंद्र सरकार यामागचे कारण जीडीपी मोजण्याची बदललेली पद्धत सांगत आहे. यामुळे येणाऱ्या काळात यामध्ये बदल केला जात आहे.

जेव्हा नवी पद्धत सुरू केली तेव्हा मात्र नव्या पद्धतीमुळे accuracy येईल, अचूक मोजणी करता येईल असे सांगणारे केंद्र सरकार आज जीडीपी मोजण्याच्या पद्धतीवर आपल्या अपयशाचे खापर फोडत आहे, हे दुर्दैवी नाही का? असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारची चुकीची धोरणे, रुपयाचे सतत होणारे अवमूल्यन, जगात होणारी सततची युद्धे, या युद्धाच्या संदर्भात आपल्या सरकारने घेतलेल्या संदिग्ध भूमिका, जागतिक स्तरावर असलेली मोठी अनिश्चितता आणि त्याहून अनिश्चित असलेली आपल्या सरकारची भूमिका, कच्चे तेल आयातीसाठी असणारे अवलंबित्व, अमेरिकेने केलेला एकत्तर्फी आणि भारतासाठी मारक असलेला व्यापारी करार आणि एकंदरीतच जागतिक पटलावर केंद्र सरकारकडून आवश्यक असलेल्या डिप्लोमसीचा अभाव आहे.

यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर हा परिणाम झाल्याचं स्पष्ट आहे. सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे. असो, केंद्र सरकारला वेळेत जाग येईल ही अपेक्षा. असेही आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षात यामध्ये बदल झाल्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!