“एका मिनिटात खटला संपला……..” ; शिवसेना पक्षाच्या चिन्हावरील कायदेशीर लढाईवर पृथ्वीराज चव्हाण यांनी ठेवलं बोट …


पुणे : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावरील कायदेशीर लढाईतील निर्णय सुप्रीम कोर्टाने थेट जानेवारी २०२६ पर्यंत पुढे ढकलल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयावर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोट ठेवल आहे.ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांनीं चिन्हाच्या खटल्यामध्ये कोर्टात चुकीचे मुद्दे मांडल्याचे त्यांनी म्हटलं आहे. एका मिनिटांमध्ये हा खटला संपला, निवडणुका झाल्या नाहीत हा मुद्दा मांडायला हवा होता, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने वारंवार केली होती. मात्र, न्यायालयाने सुनावणीची तारीख २०२६ पर्यंत निश्चित केली आहे. त्यामुळे या निवडणुका आता पुढच्या वर्षी होणार आहेत.मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. निवडणुकीच्या या महत्त्वाच्या टप्प्यात पक्षाचे मूळ धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे गटाच्या कायदेशीर बाजूवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना चिन्हाबाबतचा निर्णय लांबणीवर पडणे, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरे गटाच्या कायदेशीर टीमच्या युक्तिवादात त्रुटी राहिल्या यावर बोट ठेवले आहे.
शिवसेनेचा जो खटला झाला त्यावेळी त्यांनी पुन्हा चुकीचा युक्तिवाद केला. शिवसेनेच्या वकिलाने चुकीचे मुद्दे मांडले. एका मिनिटामध्ये हा खटला संपला. त्यामुळे त्यांनी आम्ही जानेवरीमध्ये ऐकतो असं म्हटलं म्हणजे सगळ्या निवडणुका संपल्यानंतर. आम्ही ज्या स्थानिक निवडणुका लढणार आहोत त्या दहा वर्षे झालेल्या नाहीत हा मुद्दा त्यांनी मांडायला हवा होता,असं त्यांनी म्हटलं आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!